पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

GST चा फायदा ग्राहकांना न दिल्यास कंपन्यांना १० टक्के दंड

प्रातिनिधिक छायाचित्र

वस्तू व सेवा कराच्या GST दरात कपात करण्यात आल्याचा फायदा ग्राहकांना न देणाऱ्या कंपन्यांकडून १० टक्के दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेची ३५ बैठक शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

जीएसटीच्या दरांमध्ये कपात केल्यानंतर त्याचा फायदा ग्राहकांना न देणाऱ्या कंपन्यांवर याआधी २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे, असे अर्थ खात्याचे सचिव ए बी पांडेय यांनी सांगितले. राष्ट्रीय नफेखोरीविरोधी प्राधिकरणाची मुदतही दोन वर्षांनी वाढविण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

नरेंद्र मोदी जगातील सर्वात ताकदवान नेते; ट्रम्प, पुतीनही मागे

मल्टिप्लेक्समध्ये इलेक्ट्रॉनिक चलन आणि ई तिकीट यांनाही बैठकीत परवानगी देण्यात आली. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वाहनांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्के करण्याचा प्रस्ताव संबंधित समितीकडे विचारासाठी पाठविण्यात आला असल्याचे पांडेय यांनी सांगितले.