पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीन विकसनशील देश तर मग आम्हालाही तोच दर्जा द्या - डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प हे फक्त ३६ तासांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत.

जर चीन विकसनशील देश असेल तर मग अमेरिकेलाही विकसनशील देश हाच दर्जा द्या, अशी उपरोधिक टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. विकसनशील देश या आपल्या दर्जाचा चीनकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

गरिबांच्या खात्यात पैसे जमा करा, पी. चिदंबरम यांची PM मोदींकडे मागणी

व्हाईट हाऊसमध्ये दैनंदिन पत्रकार परिषदेत ते म्हणाले, चीनने आपल्या आणि इतर देशांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला आहे. तुम्हाला तर माहितीये की ते स्वतःला विकसनशील देश समजतात. मग आता आम्हाला सुद्धा विकसनशील देशच म्हणा. विकसनशील देश असल्यामुळे त्यांना अनेक फायदे मिळतात. भारतसुद्धा विकसनशील देश आहे. आम्हीच विकसित देश आहोत. पण आता आम्हाला सुद्धा खूप विकास करायचा आहे, असे त्यांनी सांगितले.

चीनमध्ये पुन्हा कोरोनाबाधित ४६ रुग्ण आढळले, तिघांचा मृत्यू

अमेरिकेच्या मदतीने चीनने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व मिळवल्यावर त्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे गेली, असे सांगून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर तुम्ही चीनचा इतिहास बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की, ज्यावेळी त्यांनी जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व घेतले त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आलेख उंचावला. पण त्यापूर्वी त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आलेख खूप वर्षे सपाटच होता.