पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयसीआयसीआय बँकेच्या कार्यपद्धतीमध्ये मोठा बदल

आयसीआयसीआय बँक

खासगी क्षेत्रातील दिग्गज आयसीआयसीआय बँकेच्या कार्यपद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात येतो आहे. बँकेने आता खुली बैठक व्यवस्था स्वीकारली आहे. त्याचबरोबर पदानुसार तयार करण्यात आलेली बैठक व्यवस्था मोडीत काढण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. बँकेची बदललेली रचना लवकरच ग्राहकांना पाहायला मिळू शकते.

कोहिनूर इमारत प्रकरणः उन्मेष जोशी म्हणतात, ईडीला सहकार्य करु

आतापर्यंत बँकेच्या बैठक व्यवस्थेमध्ये ग्रुप लीडरसाठी वेगळी केबिन किंवा क्युबिकल होती. ती आता काढून टाकण्यात येणार आहे. ग्रुप लीडर हा सुद्धा त्याच्या टीमसोबतच बसणार आहे. त्यामुळे बँकेतील केबिन्सची संख्या घटणार आहे. बँकेच्या बैठक व्यवस्थेमध्ये कॉन्फरन्स रूम्स असतील. त्या माध्यमातून टीमच्या बैठका होतील. एका शाखेतील कोणताही कर्मचारी सहजपणे दुसऱ्या सहकाऱ्याशी संपर्क साधू शकणार आहे. पदाप्रमाणे दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्येही बदल केला जाणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संदीप बक्षी बँकेच्या प्रमुखपदी नियुक्त झाल्यानंतर हळूहळू हे सर्व बदल केले जात आहेत.

वांद्रे-कुर्ला संकुलातील बँकेच्या मुख्य शाखेतील रचनेमध्येही बदल करण्यात येत आहेत. तेथील बैठक व्यवस्था बदलण्यास सुरुवात झाली आहे. याप्रमाणेच बँकेच्या इतर सर्व शाखांमध्ये बैठक व्यवस्था बदलली जाईल.

... नाहीतर आम्ही पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरू - शरद पवार

आयसीआयसीआय बँकेचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी टी के श्रीरंग म्हणाले, आम्ही बँक व्यवस्थेतील श्रेणीपद्धती काढून टाकतो आहोत. बॅंकेच्या कामाकाजामध्ये अधिक लवचिकता आणण्यासाठी हे बदल केले जात आहेत. यामुळे कामाच्या गतीमध्येही वाढ होईल. यासाठी ठराविक पदासोबत दिल्या जाणाऱ्या लाक्षणिक सुविधांमध्येही बदल केले जाणार आहेत.