पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Hyundai Santroची अ‍ॅनिवर्सरी एडिशन लाँच, ही आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत

Hyundai Santroची अ‍ॅनिवर्सरी एडिशन

हुंडाई मोटर इंडिया लि.ने नवीन सँट्रोची अ‍ॅनिवर्सरी एडिशन लाँच केली आहे. कंपनीने याची शोरुम किंमत ५.७५ लाख रुपये ठेवली आहे. याचे दोन व्हर्जन सादर केले आहेत. सँट्रोची शोरुम किंमत ५,१६८९० रुपये आणि एएमटीची किंमत ५,७४,८९० रुपये आहे.

यावेळी कंपनीचे राष्ट्रीय विक्री प्रमुख विकास जैन यांनी म्हटले की, नवीन एडिशन ग्राहकांनी पसंत पडेल आणि जागतिक तंत्रज्ञानावर टिकलेला सँट्रोचा वारसा आणखी मजबूत करेल. यावर्षी सप्टेंबरपर्यंत हुंडाई मोटर इंडिया लि.ने ७५,९४४ नवीन सँट्रोची विक्री केली आहे. 

4G डाउनलोड स्पीडमध्ये जियो सर्वांत पुढे, अपलोडिंगमध्ये आयडिया अव्वल

ही आहे खासियत

कारदेखो.कॉमच्या मते, ही अ‍ॅनिवर्सरी एडिशन सँट्रो स्पोर्ट्स व्हेरियंटवर आधारित असेल. ती अनेक कॉस्मेटिक अपग्रेडसह सादर केली जाईल. यामध्ये ग्लॉसी ब्लॅक कलर रुफ रेल, ब्लॅक ओआरव्हीएम, डार्क ग्रे कलर व्हील कव्हर्स आणि डोअर हँडलचा समावेश आहे. त्याचबरोबर यामध्ये डोअर क्लोदिंग आणि बूट लिडवर क्रोम स्ट्रिप लावलेली असेल. त्याचबरोबर टेलगेटवर 'अ‍ॅनिवर्सरी एडिशन'चे बॅजिंग मिळेल. सँट्रोची ही विशेष अ‍ॅनिवर्सरी एडिशन  केवळ दोन एक्सटिरियर रंगात- पोलर व्हाइट आणि अ‍ॅक्वा टी मध्ये उपलब्ध होईल.

BSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी

फिचर्स
यामध्ये स्पोर्ट्स व्हेरिएंटची सर्व वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ७ इंचाचे इन्फोटेनमेंट सिस्टिम, रिअर एसी व्हेंट, स्टिअरिंग माऊंटेड ऑडिओ कंट्रोल्स, ड्यूल-फ्रंट एअरबॅग आणि एबीएस आदींचा समावेश आहे.

Infosysच्या गुंतवणूकदारांचे ५३००० कोटी बुडाले