पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे HSBC करणार ३५००० कर्मचाऱ्यांची कपात

एचएसबीसी बँक

हाँगकाँग शांघाई बँकिंग कॉर्पोरेशनने (एचएसबीसी) आपल्या व्यवसायाचे पुनर्रचना करण्याची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत ३५००० कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून कमी होत असलेला नफा हे प्रमुख कारण सांगितले जात आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूमुळेही बँकेच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. बँकेची यूरोप आणि अमेरिकेतील व्यवसायाची व्याप्तीही कमी केली जाणार असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. 

'२६/११ चा हल्ला हा 'हिंदू दहशतवादी' दाखवण्याचा कट शिजला होता'

अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध, ब्रिटनचे यूरोपीय संघातून बाहेर पडणे आणि चीनमध्ये कोरोना विषाणूची झालेली लागण यामुळे बँक अनेक अडचणींचा सामना करत आहे. अशावेळी खर्च कपातीवर लक्ष दिले जात आहे. दरम्यान, चीनमधील चांगल्या कामगिरीमुळे बँकेचा आशियातील व्यवसाय चांगला सुरु आहे. परंतु, अमेरिका आणि यूरोपमधील व्यावसायिक कामगिरी निराशाजनक आहे. 

पाकचा तो डाव फसणार अन् डोकेदुखी कायम राहणार

बँकेचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकार नोएल क्यूइन म्हणाले की, काही ठिकाणी आमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आमच्या गुंतवणूकदारांना चांगले निकाल देण्यासाठी आम्ही आमच्या योजनांवर पुनर्विचार करत आहोत. 

ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, पुढील तीन वर्षांत आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या २,३५००० वरुन कमी करुन २ लाखांपर्यंत आणण्यात येईल. त्यांनी याची विस्तृत माहिती दिली नाही. 

रेल्वेच्या या कारवाईमुळे आता अधिक तत्काळ तिकीट उपलब्ध होणार