पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आता या बँकेतून १०००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

एचएसबीसी बँक

आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्रात मोठे नाव असलेली एचएसबीसी बँक येत्या काळात १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. फायनान्सशियल टाइम्सने सोमवारी या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. या आधी बँकेने चार हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार असल्याची घोषणा केली होती. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आरेमधील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, उच्च वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता जास्त आहे. कंपनीचा खर्च कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय नव्या व्यवस्थापनाने घेतला आहे. कमी झालेले व्याजदर, ब्रेक्झिट आणि व्यापार युद्धामुळे एसएसबीसी सध्या अडचणीत सापडली आहे.

... यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

गेल्या महिन्यातच बँकेने अचानकपणे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन फ्लिन्ट यांना त्यांच्या पदावरून हटविण्याची घोषणा केली होती. ते केवळ १८ महिने या पदावर राहिले होते. अर्थात त्यांना या पदावरून का दूर करण्यात आले, याचे कारण बँकेने दिलेले नाही. त्यावेळीच बँकेने जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत दोन टक्के कपात करण्याची घोषणा केली होती.