पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आधार कार्डवर नवा पत्ता ऑनलाईन कसा अपडेट करायचा माहितीये?

आधार संशोधन विधेयक मंजूर

आपल्या राहण्याचा पत्ता बदलला तर आता नागरिकांना आधार कार्डवरील पत्ता अद्ययावत करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची किंवा कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने कोणताही आधार कार्डधारक आपला पत्ता अद्ययावत करू शकतो. अर्थात ज्यांचे मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेले आहेत. त्याच नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने आपले आधार कार्ड अद्ययावत करणे शक्य आहे. ज्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला नाही. त्यांना या पद्धतीने आपला नवा पत्ता आधार कार्डवर अद्ययावत करणे शक्य होणार नाही. आधार कार्डवरील पत्ता अद्ययावत करण्यासाठी तुमच्या नोंदलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जातो. याच ओटीपीच्या साह्याने तुम्ही पत्ता अपडेट करू शकता.

३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा - लष्करप्रमुख

आधार कार्डवरील पत्ता अद्ययावत करण्यासाठी खालील गोष्टी करा

१. UIDAI वेबसाईटवर जा.
२. तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असतील तर या वेबसाईटवरील Proceed to update Address या टॅबवर क्लिक करा.
३. सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने जमा करा.
४. जरी तुमच्याकडे पत्त्याचा आवश्यक पुरावा नसेल तरी तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील पत्ता अद्ययावत करू शकता. address validation letter च्या माध्यमातून तुम्ही तुमचा पत्ता अद्ययावत करू शकता.
५. Request for Address Validation Letter ही एकूण चार टप्प्यांची प्रक्रिया आहे.
अ. नागरिकांकडून पत्ता अद्ययावत करण्याची विनंती पत्ता पडताळणी करणाऱ्याकडे नोंदविली जाते.
ब. पत्त्याची पडताळणी करणारी व्यक्ती ही विनंती मान्य करते.
क. त्यानंतर पत्ता अद्ययावत करण्यासाठी नागरिकांकडून  UIDAI विनंती सादर केली जाते.
ड. एक सांकेतिक क्रमांक संबंधित पत्त्यावर पत्राच्या माध्यमातून पाठविला जातो. तो योग्य पद्धतीने भरल्यावर पत्ता अद्ययावत करण्याची विनंती मंजूर केली जाते.

उद्धव ठाकरे विधान परिषद पोटनिवडणुकीत उतरणार?

तुम्ही नजीकच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊनही तुमचा पत्ता अद्ययावत करू शकता. फक्त यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. सर्व ओरिजनल कागदपत्रे या ठिकाणी बघितली जातात आणि तुम्हाला परत दिली जातात.