पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोने खरेदीसाठी चाललात, तर हे जरुर वाचा

सोनं

सोने-चांदी हे केवळ दागिण्यांसाठी नव्हे तर सध्या ते गुंतवणुकीचे एक मोठे माध्यमही समजले जाते. भारतात बहुतांश लोक सोने-चांदीची खरेदी आपल्या विश्वसनीय सराफाकडून करत असतात. व्यक्ती आपल्या आवश्यकतेनुसार सोन्याची खरेदी किंवा विक्री करत असतो. आज आपण सोन्याची खरेदी किंवा विक्री करताना काय अडचणी येऊ शकतात याबाबत जाणून घेऊयात..

अर्थमंत्री म्हणतात, सार्वजनिक क्षेत्रातील १३ बँका नफ्यात, सर्वांचे आरोग्य उत्तम

सर्वांत आधी जाणून घ्या सोन्याचे दर

जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी जात असाल तर सर्वांत प्रथम सोन्याचे दर जाणून घ्या. कोणतीही व्यक्ती आयबीजेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइट https://ibjarates.com/ वर जाऊन स्पॉट रेटची माहिती घेऊ शकतो. आयबीजेएद्वारे जारी करण्यात आलेले दर देशभरात सर्वमान्य आहेत. परंतु, या वेबसाइटवर दिल्या गेलेल्या दरात ३ टक्के जीएसटीचा समावेश नसतो. सोने विकतेवेळी तुम्ही आयबीजेएच्या दराचा हवाला देऊ शकता. तुम्हाला आधीच दर माहीत असतील तर सराफ व्यापाऱ्याकडून तुम्ही चांगला दर मिळवू शकता. 

SBIची दणदणीत ऑफर, गृहकर्ज हवे असेल तर लगेच अर्ज करा

दागिने खरेदी करताना बिल अवश्य घ्या

जर तुम्ही सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करत असाल तर सराफाकडून त्याचे पक्के बिल अवश्य मागा. या बिलात तुमच्या सोन्याची शुद्धता आणि दराची माहिती दिलेली असती. जर तुमच्याकडे बिल असेल तर सोने-चांदी पुन्ही विकताना योग्य दर मिळू शकतो. जर बिल नसेल तर सराफ मनमानी दराने सोने घरेदी करु शकतो. म्हणजेच तुमचे नुकसान होऊ शकते. 

आंदोलनाच्या काळात इंटरनेट बंद ठेवल्याने तासाला किती कोटींचे नुकसान होते माहितीये?

दागिने खरेदी करताना हॉलमार्क असल्याची खात्री करा

दागिने खरेदी करताना त्याला हॉलमार्क असल्याची खात्री करा. दागिने विकताना विना हॉलमार्कवाल्या दागिन्यांना योग्य दर मिळणे कठीण असते. विक्री करताना हॉलमार्कवाल्या दागिन्यांचे मूल्य चालू बाजारभावावर निश्चित होतात. त्यामुळे हॉलमार्क प्रमाणपत्र असलेले दागिनेच खरेदी करावीत. सामान्यतः सराफ २२ कॅरेट म्हणजेच ९१.६ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करतो. २२ कॅरेटवाल्या दागिन्यांवर ९१५ हॉलमार्कचे चिन्ह असते. १८ कॅरेटचे दागिने ७५ टक्के शु्द्ध असतात. 

स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीत बदल, नव्या वर्षात OTP आवश्यक