पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टेट बँकेचे डेबिट कार्ड SMS च्या साह्याने ब्लॉक कसे करायचे माहितीये?

भारतीय स्टेट बँक

एटीएम-डेबिट कार्डचा वापर सध्या सगळ्यांनाच करावा लागतो. कोणतीही खरेदी करण्यासाठी किंवा एटीएममधून पैसे काढण्यासाठी एटीएम-डेबिट कार्डचा वापर केला जातो. पण एटीएम-डेबिट कार्ड हरविले तर काय करायचे हे पटकन अनेकांना समजत नाही. आपले एटीएम-डेबिट कार्ड हरविले तर ते तात्काळ ब्लॉक करणे अत्यंत गरजेचे असते. कार्डचा इतर कोणीही वापर करू नये, यासाठी ते ब्लॉक करण्याची गरज असते.

दंगलखोरांकडूनच नुकसानीची वसुली, दिल्ली पोलिस घेणार उत्तर प्रदेशची मदत

एटीएम-डेबिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी ग्राहकांना संबंधित बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधणे आवश्यक असते. तुम्ही ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातूनही कार्ड ब्लॉक करू शकता. पण या पद्धतीव्यतिरिक्त आणखीही एक सोपी पद्धत उपलब्ध आहे. ज्या माध्यमातून तुम्ही केवळ एसएमएस पाठवून तुमचे कार्ड ब्लॉक करू शकता. 

राज्यसभा निवडणूक : ... या नेत्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय क्वीक ऍपच्या माध्यमातून मोफत एसएमएस पाठविण्याची सुविधा देते. या माध्यमातून ग्राहक स्टेट बँकेशी संबंधित वेगवेगळे व्यवहार सहजपणे करू शकतात. पण ऑफलाईन पद्धतीनेही एसएमएस पाठवून ग्राहक आपले एटीएम-डेबिट कार्ड ब्लॉक करू शकतात. ऑफलाईन पद्धतीने म्हणजे बँकेकडे नोंदणीकृत असलेल्या तुमच्या मोबाईलवरून पाठविलेला संदेश.

संदेश कसा पाठवायचा?
BLOCK<अंतर सोडा>तुमच्या कार्डचे शेवटचे चार क्रमांक टाईप करा. हा संदेश 567676 या क्रमांकावर पाठवावा.

बँकेकडे हा मेसेज पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून संबंधित मोबाईलवर कार्ड ब्लॉक केल्याचा संदेश पाठविला जातो. या संदेशात कधीपासून कार्ड ब्लॉक झाले आहे त्याची वेळ आणि दिनांकही दिला जातो.