पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गेल्या ६ महिन्यांत पगार उशीरा झाल्याने अनेक नोकरदारांचे कर्जाचे हफ्ते चुकले - सर्वेक्षण

प्रातिनिधिक छायाचित्र

क्रेडिटमेटने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, देशात ठरलेल्या तारखेपेक्षा उशीरा पगार होत असल्याने नोकरदारांचे कर्जाचे हफ्ते चुकतात आणि ते कर्जबुडवे ठरतात. एका सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या नोकरदारांपैकी ३६ टक्के लोकांनी पगार उशीरा झाल्यानेच आम्हाला कर्जाचे हफ्ते चुकवता येत नसल्याचे म्हटले आहे. व्यवसायात नुकसान झाल्याने कर्जाचे हफ्ते चुकत असल्याचे २९ टक्के लोकांनी म्हटले आहे. क्रेडिटमेटच्या इंडिया डिलिक्वेन्सी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरीनंतर राहुल गांधींचे ट्विट

गेल्या सहा महिन्यात परिस्थिती अधिक भीषण झाली आहे. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार नियोजित तारखेपेक्षा उशिराने होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे गृहकर्जाचे तसेच इतर कर्जांचे हफ्ते चुकत आहेत, अशी माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. कर्जाचे हफ्ते चुकविल्यामुळे आता वसुलीकडे गेलेल्या सुमारे दोन लाख प्रकरणांचा या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला. यामध्ये दुचाकीसाठीची कर्जे, वैयक्तिक कर्जे, लघु उद्योगांची कर्जे, शैक्षणिक कर्जे, वैद्यकीय कर्जे या सर्वांचा अंतर्भाव आहे.

अमेरिकी आयोगाची ती मागणी अनावश्यक आणि अनाठायी, सरकारचे प्रत्युत्तर

आर्थिक नियोजन कंपनी इन्व्हेस्टोग्राफीच्या संस्थापक श्वेता जैन म्हणाल्या, नोकरी जाणे आणि पगार उशिराने होणे या दोन गोष्टी सध्या प्रकर्षाने दिसताहेत. या दोन गोष्टींचा एखाद्याच्या घरगुती अर्थसंकल्पावर थेट परिणाम होतो. ज्यांच्याकडे खूपच कमी पैसे हातात असतात त्यांची परिस्थिती जास्तच चिंताजनक असते. सर्वसाधारणपणे दोन ते तीन महिने घर चालू शकेल, इतकेच पैसे कोणाकडेही बचत खात्यात असतात.