पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एचडीएफसी बँकेची नेट बँकिंग सुविधा कोलमडली, ग्राहकांना मनस्ताप

एचडीएफसी बँक तांत्रिक समस्या

एचडीएफसी बँकेचे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग बंद असल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. सोमवारी संध्याकाळपासून अनेक ग्राहकांना नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून कोणतेच व्यवहार करता येत नाहीत. त्यामुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांचा खोळंबा झाला आहे. नेमकी कशामुळे ही समस्या उदभवली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

'... म्हणून मी मध्य प्रदेशातील भाजप सरकारविरोधात बोलत नव्हते'

एचडीएफसी बँकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तांत्रिक दोषामुळे आमच्या काही ग्राहकांना नेट आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येत नाहीत. आमची टीम यातून मार्ग काढण्यावर युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. लवकरच आमच्या या दोन्ही सेवा सुरळीत होतील, असा आम्हाला विश्वास आहे.

डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या ऑनलाईन सेवांबद्दल तक्रार नोंदवायला सुरुवात केली. संध्याकाळी ५-६ नंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी सकाळीही अनेक ग्राहकांनी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सेवा करता येत नसल्याचे म्हटले आहे.

अयोध्या प्रकरण : मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांची हकालपट्टी

नेट बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करू पाहणाऱ्या ग्राहकांना त्यांच्यासमोरील स्क्रिनवर पुढील संदेश दिसतो आहे. 'प्रिय ग्राहक, सध्या अनेक ग्राहकांनी नेट बँकिंग सेवेचा एकदम वापर केल्यामुळे ऑनलाईन व्यवस्थेवर ताण आला आहे. तुम्ही थोड्यावेळाने पुन्हा एकदा प्रयत्न करा. सहकार्याबद्दल धन्यवाद.'