पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एचडीएफसी बँकेकडून सलग दुसऱ्यांदा मुदत ठेवींच्या व्याजदरात कपात

एचडीएफसी बँक

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने महिन्याच्या कालावधीत सलग दुसऱ्यांदा दोन कोटींखालील मुदत ठेवींच्या व्याजदरांमध्ये बदल केले आहेत. बँकेकडून सध्या मुदत ठेवींवर ३.५० टक्क्यांपासून ७.१० टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जातो आहे. यामध्ये ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी इतरांपेक्षा अर्धा टक्का जास्त व्याजदर दिला जातो आहे.

पद्मसिंह पाटलांसंबधीच्या प्रश्नांवर शरद पवार भडकले

एचडीएफसी बँकेने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, बॅँकेकडून सात ते १४ दिवसांच्या ठेवींसाठी साडेतीन टक्के इतका व्याजदर दिला जातो आहे. १५ ते २९ दिवसांच्या मुदत ठेवींसाठी ४.२५ टक्के इतका व्याजदर दिला जातो आहे. ३० ते ४५ दिवसांच्या मुदत ठेवींसाठी ५.१५ टक्के, ४६ ते ६० दिवसांच्या मुदत ठेवींसाठी ५.६५ टक्के, ६१ ते ९० दिवसांच्या ठेवींसाठी ५.६५ टक्के, ९१ दिवस ते सहा महिन्यांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठीही ५.६५ टक्के, सहा महिने एक दिवस ते नऊ महिन्यांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठी ६.२५ टक्के तर नऊ महिने एक दिवस ते एक वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठी ६.३५ टक्के इतका व्याजदर दिला जातो आहे.