पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एचडीएफसी, पीएनबी, ऍक्सिससह विविध बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल

मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल

जून महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर त्याचा परिणाम साहजिकच बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरावर होणे अपेक्षित होते. जुलै महिन्यात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांनी आपल्याकडील मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केले आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी बँक आणि फेडरल बँक यांचा समावेश आहे. 

गिरीश महाजन हे देशातील मोठे नेते, संजय राऊत यांचा टोला

एचडीएफसी बँकेने २२ जुलैपासून मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केले आहेत. सात ते ४५ दिवसांपर्यंतच्या ठेवीसाठी साडेपाच टक्के, ४६ दिवस ते सहा महिन्यांसाठीच्या मुदत ठेवींसाठी सहा टक्के, एक वर्षांसाठीच्या मुदत ठेवींसाठी ७.१० टक्के व्याजदर तर एक वर्षापेक्षा अधिक आणि दोन वर्षांपर्यतच्या मुदत ठेवींसाठी बँकेने ७.२० टक्के व्याजदर देऊ केले आहे.

पंजाब नॅशनल बँकेने सात ते ४५ दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठी साडेपाच टक्के, ४६ ते ३३३ दिवसांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठी ६.७५ टक्के, एक वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीसाठी ६.०८ टक्के व्याजदर देण्याचे बँकेने जाहीर केले आहे. एक वर्षापेक्षा जास्त ते तीन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठी बँकेने ६.७५ टक्के व्याजदर देऊ केला आहे.

राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट; ईव्हीएमवर चर्चा ?

ऍक्सिस बँकेने सात दिवस ते सहा महिन्यांसाठी मुदत ठेवींसाठी ६.२५ टक्के व्याजदर दिला आहे. सहा महिन्यांपुढे ९ महिन्यांपर्यंतच्या मुदत ठेवीसाठी ६.५० टक्के, नऊ महिन्यांपुढे एक वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठी ७ टक्के तर एक वर्षापुढे दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीसाठी ७.२ टक्के व्याजदर दिले आहे.

बँक ऑफ बडोदाने सात ते ९० दिवसांसाठीच्या मुदत ठेवींवर ४.७५ टक्के, ९१ दिवस ते एक वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी ६.२५ टक्के, एक वर्षासाठीच्या मुदत ठेवींवर ६.४५ टक्के व्याजदर देऊ केला आहे.