पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीएसटी रिटर्न न भरल्यास कडक कारवाई

जीएसटी

वेळेवर जीएसटी रिटर्न दाखल न करणाऱ्या व्यावसायिकांवर सरकारची करडी नजर राहणार आहे. आता सलग दोनवेळा रिटर्न न भरणारे व्यावसायिक आपले ई-वे बिल काढू शकणार नाहीत.

सूत्रांनी 'हिंदुस्थान'ला सांगितले की, अर्थ मंत्रालय पुढील आठवड्यात यावर एक अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलचा हा निर्णय जूनपासून लागू केला जाणार होता. व्यावसायिकांसमोरील अडचणींमुळे सरकार हे टाळत होते. त्यामुळे त्याला उशीर झाला आहे.

रिलायन्स कम्युनिकेशनला मोठा तोटा, अनिल अंबानींचा राजीनामा

२२ लाख रिटर्न भरलेच नाहीतः
८  नोव्हेंबर २०१९ पर्यंत देशात २२ लाख व्यावसायिकांनी रिटर्न भरलेले नाहीत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पुढील महिन्यापासून जीएसटी संकलनात वाढ होण्याची आशा व्यक्त केली होती.

'एक देश, एकाच दिवशी वेतन' व्यवस्था लवकरच देशात लागू

अडचणी वाढणार
* रिटर्न दाखल न झाल्यास व्यावसायिक ईवे बिल जारी करु शकणार नाहीत.
* केंद्र पुढील महिन्यापासून यासाठी अधिसूचना जारी करु शकते.