पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

GST च्या टप्प्यांमध्ये लवकरच मोठा बदल; मोबाईल, रेल्वे प्रवास महागणार

निर्मला सीतारामन आणि अनुराग ठाकूर

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) आकारणीसाठी सध्या असलेले चार टप्पे कमी करून ते तीनवर आणले जाऊ शकतात. जीएसटी परिषदेमध्ये यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे या निर्णय प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर 'हिंदुस्थान टाइम्स'ला सांगितले. सध्या जीएसटी आकारणीसाठी ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार टप्पे आहेत. ते कमी करून आता ८, १८ आणि २८ टक्के अशा तीन टप्प्यांमध्येच जीएसटीची आकारणी केली जाईल. जीएसटीतून सरकारला मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळते आहे.

कोणीही आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नका; संजय राऊतांचा मोदींना टोला

जीएसटी आकारणी संबंधित दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोबाईल हँडसेट, पिझ्झा, हवाई प्रवास, एसी डब्यातील रेल्वे प्रवास, रुग्णालयातील उच्च दर्जाच्या सूटमधील उपचार मुक्काम, चित्रे, लिनन, सिल्क अशा कपड्यांवरील जीएसटी वाढविण्याचा सरकार विचार करीत आहे. या माध्यमातूनही सरकारचे उत्पन्न वाढणार आहे. त्यासाठीच या वस्तू आणि सेवांवरील जीएसटी वाढविला जाईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोनपैकी एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, वरील सर्व वस्तू व सेवा सर्वसाधारणपणे सामान्य लोकांकडून वापरल्या जात नाहीत. त्यामुळे या वस्तू व सेवांवरील ५ किंवा १२ टक्क्यांची जीएसटी आकारणी योग्य नाही. त्यामुळेच काही जणांनी या वस्तू व सेवांवरील जीएसटी आकारणी दर वाढविण्याची सूचना केली आहे. या वस्तू व सेवांवर आता ८ किंवा १८ टक्क्यांनी जीएसटीची आकारणी केली जाऊ शकते, असेही हा अधिकारी म्हणाला.

'नागरिकत्व विधेयकाला विरोध करणारे पक्ष पाकिस्तानचीच भाषा बोलताहेत'

राज्यांनीही जीएसटी आकारणीचे टप्पे चारवरून तीन करण्याची सूचना केली आहे. यामुळे जीएसटीची आकारणी आणखी सुटसुटीत होऊ शकेल. काही राज्यांनी मात्र ८ आणि १८ टक्क्यांच्या मध्ये आणखी एक १५ टक्क्यांचा टप्पा असावा, असे म्हटले आहे. पण बहुतांश राज्यांनी जीएसटी आकारणी आणखी सुटसुटीत असावी, असेच म्हटले असल्याचे दुसऱ्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.