पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता

प्रातिनिधिक छायाचित्र

पुढल्या महिन्यात लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा केंद्र सरकारकडून वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेला गती यावी आणि करदात्यांकडे खर्च करण्यासाठी अधिक पैसा राहावा, यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. 

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वार्षिक तीन लाखांपर्यंत वाढविण्याची घोषणा अर्थसंकल्प मांडला जाण्यावेळी केली जाण्याची शक्यता आहे. सध्या ही मर्यादा अडीच लाख रुपये आहे. ती आणखी ५० हजार रुपयाने वाढविली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुंबईत लोकलचा प्रवास महागणार, पण...

करांमध्ये सवलत दिल्यास त्याची अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदतच होणार आहे. आर्थिक विकासाचा दर गेल्या पाच वर्षांतील निचांकी पातळीवर पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ केल्यास देशातील पाच कोटी करदात्यांच्या हातात सुमारे २५०० रुपये खर्चासाठी उपलब्ध होणार आहेत. 

प्राप्तिकर कायद्यातील कलम ८० सी नुसार गुंतवणूक केलेले दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न सध्या करमुक्त आहे. ही मर्यादाही वाढविण्याचा विचार केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून केला जातो आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या ५ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडणार आहेत.