पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छोट्या सरकारी गुंतवणूक योजनांवरील व्याजदरात मोठी कपात

बँक

वेगवेगळ्या छोट्या गुंतवणुकीच्या योजनांवरील व्याजदरात केंद्र सरकारने मंगळवारी रात्री कपात केली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी योजना यांचा समावेश आहे. या सर्व बचत योजनांवरील व्याजदरात ०.७ ते १.४ टक्क्यांपर्यत कपात करण्यात आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील सहा बँका आजपासून इतिहासजमा, अन्य बँकात विलिनीकरण

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदरात ७.९ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांसाठी आता ७.६ टक्के इतकेच व्याज मिळेल. आधी ही टक्केवारी ८.४ होती. 

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ७.९ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यत कमी करण्यात आले आहे. त्याचवेळी किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.६ टक्क्यांवरून ६.९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्याजदरातील बदलाला मंजुरी दिली आहे, असे या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे.

कोविड १९ चाचणी मोफत करा, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

छोट्या गुंतवणूक योजनांवरील व्याजदरात कपात झाल्यामुळे यापुढे एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरही कमी व्याज मिळणार आहे. या मुदत ठेवींसाठी आधी ६.९ टक्के व्याज मिळत होते. ते आता ५.५ टक्के इतकेच मिळणार आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Govt cuts interest rate on PPF NSC Kisan Vikas Patra and Sukanya Samriddhi Accounts from April 1