पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या व्याजदरात कपात

जीपीएफच्या व्याजदरात कपात

जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या GPF व्याजदरांमध्ये केंद्र सरकारने कपात केली आहे. सरकारने जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर ७.९ टक्के केला आहे. गेल्या तिमाहीमध्ये जनरल प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर ८ टक्के इतका होता. त्यामध्ये चालू तिमाहीत ०.१ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, लोढांकडे मुंबईची जबाबदारी

अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका शासन आदेशात म्हटले आहे की, जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि या स्वरुपाच्या इतर फंड्सवरील व्याजदर जुलै ते सप्टेंबर २०१९ तिमाहीसाठी ७.९ टक्के करण्यात आले आहे. १ जुलैपासून नवे दर लागू झाले आहेत. 

... या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये कपात

जनरल प्रॉव्हिडंट फंड (सेंट्रल सर्विसेस)
कंट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड (इंडिया)
स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड
इंडियन ऑर्डनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड
इंडियन ऑर्डनन्स फॅक्ट्रीज वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड
जनरल प्रॉव्हिडंट फंड (डिफेन्स सर्विसेस) 
डिफेन्स सर्विसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड
आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड
इंडियन नेवल डॉकयार्ड वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड