पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकार ४० हजार कोटींचे कर्ज घेण्याची शक्यता

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची शक्यता आहे. या घडामोडींशी संबंधित तीन अधिकाऱ्यांनी ही माहिती हिंदुस्थान टाइम्सला दिली. राज्य सरकारांप्रमाणेच काही वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांनाही सरकार पैसे देणे आहे. या कंपन्यांकडून घेतलेल्या वस्तू, सेवा यासाठीचे देणी बाकी आहेत. कर्जातील रकमेमधून हे पैसे देण्याचा सरकारचा विचार आहे.

सरकारचे पुढचे पाऊल, कोरोना रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बहुतांश मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे वस्तू व सेवा करापोटी केंद्राकडून देय असलेली रक्कम त्वरित देण्याची मागणी केली. त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामगारांचे वेतनही देण्याची मागणी करण्यात आली. यासोबत इतरही काही मागण्या राज्य सरकारांकडून करण्यात आल्या आहेत. तीन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. 

...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल

कॅबिनेट सचिव आणि केंद्र सरकारच्या व्यय विभागाचे अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही स्थितीत राज्य सरकारे आर्थिक अडचणीत सापडू नयेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. रोकड उपलब्धतेअभावी काही राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यांत देण्याचे आधीच जाहीर केले आहे.