पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नोकरदार आणि करदात्यांसाठी केंद्र सरकारचे ५ दिलासादायक निर्णय

प्रतिकात्मक छायाचित्र

कोरोना विषाणूचे संकट पाहता केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेबरोबर सामान्य लोकांच्या मदतीसाठीही पाऊल उचललेले आहे. मागील महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी १.७० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सरकारने आतापर्यंत समाजातील विविध वर्गांसाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याचबरोबर नोकरदार आणि करदात्यांसाठीही सरकारने अनेक निर्णयांची घोषणा केली आहे. 

कोरोनामुळे पुण्यात आज २ महिलांचा मृत्यू

१. कर परतावा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यावसायिक आणि वैयक्तिक करदात्यांना १८ हजार कोटी रुपयांचा कर परतावा त्वरीत जारी करण्याची घोषणा केली. कर विभागाने एका टि्वटमध्ये म्हटले की, भारत सरकारने निर्णय घेतला आहे की, ५ लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित कर परतावा आणि जीएसटी/कस्टम परतावा त्वरीत जारी केले जातील. 

२. ईपीएफ काढणे

सरकारने कोरोना विषाणूच्या संकटामुळे नोकरदारांसमोर आलेल्या अडचणी पाहता एक विशेष तरतूद केली आहे. त्या अंतर्गत सरकारने कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) खात्यातून तीन महिन्यांइतके वेतन काढण्याची सूट दिली आहे. या रकमेवर सेवा शूल्काचीही सूट दिली आहे. 

लॉकडाऊनः कर्फ्यू पास मागणाऱ्या पोलिसाचा हातच छाटला

३. प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ

आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी प्राप्तीकर भरण्याची अखेरची तारीख वाढवून ३० जून २०२० केली आहे. उशिराने प्राप्तीकर भरल्यास द्यावे लागणारे व्याज १२ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आले आहे. 

४. जीएसटी विवरणपत्र

मार्च, एप्रिल आणि मेसाठी जीएसटी विवरणपत्र भरण्याची कालमर्यादा ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो, ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम!

५. आधार-पॅन लिंकिंग

आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्याची कालमर्यादाही ३१ मार्चवरुन ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे.