पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुगलमध्ये सुंदर पिचाईंकडे आणखी मोठी जबाबदारी, अल्फाबेटचे CEO पद

सुंदर पिचाई

गुगलची सहकंपनी अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर आता सुंदर पिचाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेतील डिजिटल विश्वातील या मोठ्या घडामोडीकडे अनेक जण कुतूहलाने पाहात आहेत. विशेष म्हणजे गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्याकडून आता सुंदर पिचाई हे कार्यभार स्वीकारणार आहेत. सुंदर पिचाई हे आधीच गुगलचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत.

आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने नक्की काय केलं वाचा...

गुगलच्या महत्त्वाकांक्षी स्वयंचलित कार आणि लाईफ सायन्सेस क्षेत्रातील आगामी प्रकल्पांची जबाबदारी आता सुंदर पिचाई यांच्याकडे असणार आहे. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे दोघेही त्यांच्या पदावर कायम राहणार आहेत. सहसंस्थापक, भागधारक आणि अल्फाबेटचे संचालक मंडळाचे सदस्य म्हणून ते आपले काम पाहणार आहेत.

कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी म्हटले आहे की, कंपनी अधिक चांगल्या पद्धतीने चालविण्याचा विषय येतो त्यावेळी आम्ही व्यवस्थापन क्षेत्रातील महत्त्वाची पदे आमच्याकडेच राहावीत, असा विचार कधीच करू शकणार नाही. गुगल आणि अल्फाबेट या दोन्ही कंपन्या अधिक सक्षमपणे भविष्यात चालविण्यासाठी सुंदर पिचाई यांच्याशिवाय इतर कोणीही अधिक चांगले नेतृत्त्व करू शकत नाही, यावर आमचा विश्वास आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील एकाही प्रकल्पाला स्थगिती नाही: CM उद्धव ठाकरे

अल्फाबेट या कंपनीची २०१५ मध्ये स्थापना करण्यात आली. गुगलपासून वेगळे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी आणि काही महत्त्वाचे प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी अल्फाबेटची सुरुवात करण्यात आली.