पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खूशखबर!, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात ६ टक्क्यांची वाढ

जीएसटी

सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) आघाडीवर सातत्याने निराशाजनक वृत्त येत असताना वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाबाबत खूशखबर समोर आली आहे. तीन महिन्यांनंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन एक वर्षांपूर्वी याच महिन्याच्या तुलनेत सहा टक्क्यांनी वाढून १.०३ लाख कोटी रुपये झाली आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन ९५,३८० कोटी रुपये होती. तर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ९७,६३७ कोटी रुपये संकलन झाले होते.

फडणवीसांना सत्तेसाठी अति घाई आणि फाजील आत्मविश्वास नडलाः राऊत

एका अधिकृत निवेदनानुसार, यावेळी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय जीएसटीच्या माध्यमातून १९,५९२ कोटी, राज्य जीएसटीतून २७,१४४ कोटी, एकीकृत जीएसटीतून ४९,०२८ कोटी रुपये आणि जीएसटी उपकरातून संकलन ७,७२७ कोटी रुपये आहे. एकीकृत जीएसटीतून २०,९४८ कोटी रुपये आयातीतून संकलन होईल. 

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

याचपद्धतीने उपकर (सेस) संकलनात ८६९ कोटी रुपये आयात उपकरातून प्राप्त झाले आहेत. यापूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनात वार्षिक आधारावर घसरण झाली होती.