पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रक्षाबंधनपूर्वी सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक

सोनं स्वस्त तर चांदी महागली

सोन्याने नवा उच्चांक गाठला असून बुधवारी चेन्नईतील सराफ बाजारात २४ कॅरेट सोने प्रतितोळा ३९ हजार ५०० रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचले आहे. दिल्लीत ३८ हजार १० तर मुंबईत सोने प्रतितोळा ३७ हजार ३६० वर पोहचले आहे.

बाजार विश्लेषकांच्या मतानुसार, जागतिक स्तरावर व्यापारी युद्ध आणि आर्थिक मंदीच्या चितेंमुळे गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे यापूर्वीच व्यापाऱ्यांची चिंता वाढवली आहे. हाँकाँग आणि अर्जेंटिनामधील मुद्रा संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी गुंतवणूकदार सोने आणि चांदीच्या धातूमध्ये सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. 

io GigaFiber ग्राहकांना 'फर्स्ट डे, फर्स्ट शो' पाहता येणार

 नवी दिल्लीतील ‘ऑल इंडिया सराफा असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार, चांदीने तब्बल २ हजार रुपयांच्या वृद्धीसह विक्रमी ४५,००० रुपयांचा टप्पा ओलांडला. मुंबईच्या सराफ बाजारात ‘आयबीजेए’ने प्रसिद्ध केलेल्या घाऊक किमतींनुसार, स्टॅण्डर्ड सोने (०.९९५ शुद्धता) मंगळवारच्या व्यवहाराअंती ३७,७९५ रुपये, शुद्ध सोने (०.९९९ शुद्धता) ३७,९५० रुपये तर ०.९१६ शुद्धतेचे सोने प्रति १० ग्रॅम ३४,७६० रुपयांवर होते.