पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून दिवाळीपर्यंत सोने विक्रमी दर गाठण्याची शक्यता

सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत

देशात आर्थिक मंदीचे सावट दिसत असताना सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. आर्थिक अभ्यासकांच्या मते, मंदीची चाहूल दिसत असल्याने आणखी काही दिवस सोन्याचे दर उच्च पातळीवरच राहण्याची शक्यता आहे. 

ऑर्बिटरने विक्रम लँडरचे 'लोकेशन ट्रेस' करत टिपले छायाचित्र

सध्याच्या घडीला सोने आणि चांदीमध्ये अधिक गुंतवणूक पाहायला मिळत असून दिवाळीपर्यंत सोने-चांदी विक्रमी दराला गवसणी घालण्याची शक्यताही अभ्यासकांनी वर्तवली आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात सोने गुंतवणूकीकडे असणारा कल हा २० टक्क्यांहून अधिक आहे. गतवर्षी तो केवळ ६ टक्के इतका होता.   

किल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्याः राज ठाकरे

दिल्लीतील बुलियन अँण्ड ज्वेलर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विमल गोयल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील मंदीच्या संकटाच्या परिणामी सोने दरात वाढ होत आहे. देशासह अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करण्यास भर देत आहेत. गुंतवणुकीसाठी सोन्याशिवाय अन्य कोणताही उत्तम पर्याय नाही, असेही ते यावेळी म्हणाले.