पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत, नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी

अभिजित बॅनर्जी

भारतीय अर्थव्यवस्था सध्या खूप चिंताजनक स्थितीतून जात आहे. लोकांची क्रयशक्ती मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, अर्थव्यवस्थेसाठी हे धोकादायक असल्याचे नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांची पत्नी आणि अन्य नोबेल पुरस्कारार्थी अर्थशास्त्रज्ञ एस्थर डफ्लो आणि हार्वर्डचे मायकल क्रेमर हे सुद्धा उपस्थित होते. सोमवारीच या तिघांना जागतिक प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

भाजपचा 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र'चा संकल्प

अभिजित बॅनर्जी म्हणाले, माझ्या मते भारतीय अर्थव्यवस्था खूप वाईट स्थितीतून जात आहे. २०१४-१५ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. खूप खूप वर्षांनंतर पहिल्यांदाच असे घडते आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे हे कोणत्या आकडेवारीवरून शोधायचे असाही प्रश्न भारतात निर्माण झाला आहे. सरकार त्यांच्यासाठी नकारात्मक असलेली आकडेवारी थेटपणे चुकीची असल्याचे सांगते आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्राच्या प्रांजल पाटील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी

अर्थव्यवस्थेची गती मोठ्या प्रमाणात मंदावली असल्याची सरकारला माहिती आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यातून मार्ग काढण्यासाठी काय केले पाहिजेत, यावर त्यांनी स्पष्टपणे कोणताही उपाय सुचविण्यास नकार दिला. पण प्रत्येकवेळी सर्व समाजघटकांना खूश ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.