पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थव्यस्थेला धक्का, जीडीपी ७ टक्क्यांच्या खाली तर विकासदर ५.८ %

उद्योग (प्रतिकात्मक छायाचित्र) (Reuters file photo)

मोदी सरकारने शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अर्थजगतातून वाईट बातमी आली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या चौथ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर घटून ६ टक्क्यांच्या खाली गेला आहे. नुकताच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न(जीडीपी) अवघ्या ५.८ टक्के दराने वाढला आहे. 

दुसरीकडे श्रम सर्वेक्षणही समोर आला असून मागील आर्थिक वर्षात देशातील बेरोजगारीचा दरही ६.१ टक्क्यावर राहिला आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात हीच आकडेवारी लीक झाली होती आणि त्यावेळी बेरोजगारीचा आकडा हा वर्ष १९७२-७३ नंतर पहिल्यांदाच इतक्या वर उसळला गेल्याचे सांगण्यात आले होते.  

चौथ्या तिमाहीनंतर अत्यंत कमकुवत आकड्यांचा परिणाम संपूर्ण आर्थिक वर्षाच्या जीडीपीच्या वाढीवर पडला. जो ७ टक्क्यांच्या खाली घसरुन ६.८ टक्क्यांवर आला आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत जीडीपी विकास दर ८.१ टक्के राहिला होता. तर संपूर्ण आर्थिक वर्षात देशातील आर्थिक विकास हा ७.२ टक्के दराने झाला होता. म्हणजेच, जानेवारी-मार्च तिमाहीत आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या तुलनेत संपूर्ण आर्थिक वर्षाच्या जीडीपी विकासदराच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये हा आकडा ०.४ टक्क्यांनी घसरण झाली.