पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थव्यवस्थेत सुधारणा, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकासदर ४.७ टक्के

निर्मला सीतारामन (ANI File Photo )

अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकास दर वाढून ४.७ टक्के झाला आहे. यापूर्वी दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) विकासदर अवघा ४.५ टक्के राहिला होता. जो मागील साडेसहा वर्षांच्या नीचांकावर होता. दरम्यान अनेक आर्थिक संस्थांनी तिसऱ्या तिमाहीत विकासदर घटून ४ टक्के राहिल असा अंदाज वर्तवला होता. 

एवढं खोटं का बोलता?; गृहमंत्र्यांचा काँग्रेस, ममता बॅनर्जींना सवाल

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबरमध्ये जीडीपी वाढीचा दर घसरून ४.५ टक्केवर आला होता. मागील २६ तिमाही म्हणजेच साडेसहा वर्षांतील हा भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वांत मंदगतीचा विकासदर आहे. एक वर्षांपूर्वी हा ७ टक्के होता. तर मागील तिमाहीत हा ५ टक्के होता. 

निर्भया प्रकरणः फाशी जन्मठेपेत बदला, दोषी पवनची याचिका

तिसऱ्या तिमाहीबाबत (ऑक्टोबर-डिसेंबर) जपानची आर्थिक सेवा पुरवणारी कंपनी नोमुराने विकासाचा वेग आणखी कमी होईल आणि विकास दर घटून ४.३ टक्केवर पोहचू शकतो, असा अंदाज वर्तवला होता. वर्ष २०२० च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी विकासदरात किरकोळ सुधारणा होऊन तो ४.७ टक्के राहू शकतो, असेही म्हटले होते.

राज्यात लवकरच मुसलमानांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण

आरबीआयने रेपो रेटमध्ये १.३५ टक्क्यांची कपात केल्यानंतरही कर्जाची मागणी वाढली नाही. परंतु, महागाईचा दर ४ टक्क्यांच्या लक्ष्यापासून सुमारे दुपट्टीवर पोहोचला आहे. औद्योगिक उत्पादनातही घसरण झाली आहे. तर सरकारच्या म्हणण्यानुसार जीएसटीसारख्या निर्णयाचा परिणाम येणाऱ्या दिवसांत दिसणार आहे.