पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील विकासाचा वेग आणखी मंदावला, जीडीपी ४.५ टक्क्यांवर

देशातील विकासाचा वेग आणखी मंदावला, जीडीपी ४.५ टक्क्यांवर

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर देशासाठी वाईट बातमी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबर तिमाहीत जीडीपी वृद्धी दर घसरून ४.५ टक्क्यांवर आला आहे. मागील २६ तिमाहीमधील ही भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वांत मंदगतीचा विकास दर आहे. एक वर्षांपूर्वी हा दर ७ टक्के होता. तर मागील तिमाहीत तो ५ टक्के होता. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात ८ प्रमुख क्षेत्रातील औद्योगिक वृद्धी -५.८ टक्के राहिला. 

पोस्ट विभागाविरोधात २५ लाख तक्रारी, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

महसुली तोट्याच्या आघाडीवरही वाईट बातमी आहे. २०१८-१९ च्या पहिल्या ७ महिन्यात म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यानही महसुली तोटा विद्यमान आर्थिक वर्षाच्या लक्ष्यापेक्षा जास्त झाला आहे. पहिल्या ७ महिन्यात महसुली तोटा ७.२ ट्रिलियन रुपये (१००.३२ अब्ज रुपये) राहिला. जो अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षासाठी ठेवण्यात आलेल्या लक्ष्याच्या १०२.४ टक्के आहे. 

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार नाही

सरकारकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑक्टोबरच्या कालावधीत सरकारला ६.८३ ट्रिलियन रुपयाचा महसूल प्राप्त झाला. तर खर्च १६.५५ ट्रिलियन रुपये राहिला.

जानेवारी २०२० मध्ये लाँच होणार टाटा अल्ट्रोज, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत