पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फरार उद्योगपती विजय मल्ल्याला इंग्लंडमध्ये झटका, कोर्टाने याचिका फेटाळली

विजय माल्या

भारतात आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेला फरारी उद्योगपती विजय मल्ल्या याला इंग्लंडमधील उच्च न्यायालयाकडून सोमवारी मोठा झटका मिळाला. एकूण ९००० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भारत सरकारकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात त्याने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता विजय मल्ल्याला भारतात आणण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल पडले असल्याचे मानण्यात येत आहे.

पालघरमधील घटना गैरसमजुतीतून, धार्मिक रंग देऊ नकाः ठाकरे

इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाने सोमवारी याचिका फेटाळली. त्यामुळे आता विजय मल्ल्याला भारतात पाठविण्याचा निर्णय इंग्लंडमधील गृह सचिव प्रिती पटेल यांच्याकडे जाणार आहे. त्यांना या विषयावर अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे.

कोरोना: नो मास्क, नो पेट्रोल-डिझेल, देशभरात लागू

विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सने वेगवेगळ्या बँकांकडून तब्बल ९००० कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. पण या कर्जाची परतफेड न करता विजय मल्ल्या इंग्लंडला पळून गेला होता. विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्येच जामीनावर मुक्त आहे. ३१ मार्चला केलेल्या एका ट्विटमध्ये त्याने म्हटले होते की, किंगफिशर एअरलाईन्सने घेतलेले १०० टक्के कर्जाची परतफेड करण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी मी रितसर तयारीही दर्शविली आहे.