पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लक्ष देऊन ऐका!, जुन्या डेबिट कार्डनेही होऊ शकते फसवणूक

डेबिट कार्ड (प्रतिकात्मक छायाचित्र)

देशातील सर्वांत मोठी बँक एसबीआयने एटीएमच्या वाढत्या फसवणुकीमुळे अलर्ट जारी केला आहे. जुने आणि मुदत संपलेले कार्ड बाळगताना बेजबाबदारपणा टाळण्याची सूचना केली आहे. ज्याप्रमाणे आपण नव्या किंवा चालू कार्ड हाताळतो. त्याप्रमाणेच जुन्या कार्डचीही काळजी घ्या, असे एसबीआयने म्हटले आहे. हा इशारा मॅग्नेटिक स्ट्रिप असणाऱ्या कार्ड्सच्या फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे. 

D-Martचे राधाकृष्ण दमाणी भारतातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती

स्टेट बँकेने ग्राहकांसाठी सतर्कता टिप्स जारी केल्या आहेत. बँकांनी ग्राहकांना मॅग्नेटिक स्ट्रिप असलेल्या कार्ड्सऐवजी चिप आधारित डेबिट कार्ड्स दिले आहेत. नवीन कार्ड आल्यानंतर ग्राहकांनी आपले जुने कार्ड बाद झालेत असे समजून ते फेकून दिलेत किंवा ते व्यवस्थित ठेवलेले नाहीत. याचाच फायदा हॅकर्सनी घेतला आहे. कारण या कार्डवर तुमचा १६ किंवा १९ डिजिट नंबर असतो. त्याचा वापर करुन हॅकर्सनी अनेकांची खाती साफ केली आहेत. आरबीआयने लोकपालकडे मिळालेल्या एकूण तक्रारीपैकी २७ टक्के अशा स्वरुपाच्या तक्रारी असल्याचे म्हटले.

या गोष्टींची घ्या काळजी
- बहुतांश युजर्स एटीएमने पैसे काढताना ब्लिंक करणाऱ्या लाइटकडे लक्ष देत नाहीत. अशावेळी फसवणूक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे एटीएममधून बाहेर पडताना एटीएमची हिरवी लाइट ब्लिंक करत आहे की नाही याची खात्री करुन घ्या.

- एटीएम स्लिप कधीही केबिनमध्ये फेकून देऊ नका. स्लिपमध्ये बँक अकाऊंटची विस्तृत माहिती असते. तिचा वापर अकाऊंट हॅक करण्यासाठी केला जाऊ शकतो. स्लिपचे नेहमी छोटे-छोटे तुकडे करुन डस्टबीनमध्ये फेका. शक्यतो स्लिप प्रिंट करण्याचा ऑप्शन एटीएमला देऊ नका. कारण व्यवहाराची सर्व विस्तृत माहिती ऑनलाइन आणि मोबाइलवर येत असते. 

भारताच्या विकासदराच्या अंदाजात मूडीजकडून आणखी कपात

- शॉपिंगदरम्यान पिन टाकताना हॉटेल, दुकान, पेट्रोल पंप किंवा इतर ठिकाणी सावध राहा. एटीएममधून पैसे काढतानाही यूजर पिन फीड करताना काळजी घेताना दिसत नाही. कारण ४८ टक्के फसवणुकीचे प्रकरण अशाप्रकारचे असतात. 

- बँकेनुसार सध्या ऑनलाइन शॉपिंगचे अनेक पर्याय तात्पुरत्या इव्हेंटमध्येही उपलब्ध होतात. उदा. मॅच, ट्रेड फेअर, ऑटो फेअर, विविध प्रदर्शन आदी ठिकाणी अनेक तात्पुरते स्टॉल लावण्यात आलेले असतात. तिथेही कार्ड पेमेंट होते. अशावेळी तिथे कार्ड पेमेंट टाळा किंवा फक्त प्रतिष्ठित कंपनीच्या स्टॉलवरच कार्डचा वापर करा.

... अखेर एअरटेलने १०००० कोटी सरकारकडे जमा केले

- अनेकवेळा आपण आपला अकाऊंट नंबर मोबाइलशी लिंक नसतो. अशावेळी एटीएममधून फसवणूक झाल्यास आपल्याला रिअल टाइम माहिती मिळत नाही. त्यामुळे आपले अकाऊंट नेहमी आपल्या चालू असलेल्या मोबाइल नंबरशी अवश्य लिंक करा.