पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत फ्लाईंग टॅक्सीसेवा सुरू करण्यासाठी उबर एअरचे प्रमुख उत्सुक

प्रातिनिधिक छायाचित्र

'उबर एअर' या उबर कंपनीच्या महत्त्वाकांक्षी 'फ्लाईंग टॅक्सी' प्रकल्पासाठी पुढच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहाराची निवड करण्यात आली असली, तरी भविष्यात हा प्रकल्प लवकरात लवकर भारतात सुरू करण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. या संदर्भात उबर एलिव्हेटचे प्रमुख एरिक एलिसन म्हणाले, भविष्यात दूरदृष्टीने विचार केल्यास भारतात उबर एअर सेवेची सुरुवात करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत.

फ्लाईंग टॅक्सी अर्थात हवाई टॅक्सी सुरू करण्यासाठी गेल्यावर्षी उबरने अमेरिकेतील लॉस एंजेलिस आणि डलास या दोन शहरांची निवड केली होती. त्यावेळी अमेरिकेबाहेर ही टॅक्सीसेवा सुरू करण्यासाठी भारतातील मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या तिन्ही शहरांचा विचार करण्यात आला होता. आता कंपनीने ऑस्ट्रेलियातही उबर एअरची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे.     येत्या २०२३ पर्यंत अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशांतील बाजारात ही सेवा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.

भारतात २०२३ पर्यंत फ्लाईंग टॅक्सी सुरू करण्याची आमची कल्पना महत्त्वाकांक्षी आहे हे खुद्द एलिसन यांनीही मान्य केले आहे. ते म्हणाले, आम्ही भारतातील नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी, राज्य सरकारचे काही अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर भारतात ही सेवा सुरू होऊ शकते, याबद्दल आम्ही आशावादी आहोत. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे फ्लाईंग टॅक्सीसेवा ही मुंबईसारख्या शहरात कार चालविण्यापेक्षा स्वस्त राहिल, असा विश्वास उबर एअरने व्यक्त केला आहे. एलिसन म्हणाले, रोजच्या प्रवासात कार चालविण्यापेक्षा फ्लाईंग टॅक्सीने प्रवास करणे हे आर्थिकदृष्ट्या अधिक परवडणारे ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पुढच्यावर्षीपासून परदेशात या टॅक्सींची चाचणी सुरू होणार आहे.