पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे या सात शहरांतील घरांच्या विक्रीत होणार घसरण

बांधकाम क्षेत्र (संग्रहित छायाचित्र)

संपत्तीबाबत सल्ला देणारी कंपनी एनरॉकनुसार कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे यावर्षी देशातील सात मोठ्या शहरातील घरांच्या विक्रीत ३५ टक्क्यांची घसरण होऊ शकते. दिल्ली-एनसीआर (गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद), मुंबई महानगर क्षेत्र, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरु, पुणे आणि हैदराबाद ही सात शहरे आहेत. 

लॉकडाऊन कसा संपवायचा, पंतप्रधानांनी मागविल्या शिफारशी

कंपनीने एका अहवालात म्हटले की, व्यावसायिक संपत्तीच्या विक्रीवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. या अहवालानुसार भाड्याने कार्यालय देण्याच्या व्यवसायात ३० टक्क्यांपर्यंत तसेच किरकोळ क्षेत्रात ६४ टक्केपर्यंत घसरण होऊ शकते. एनरॉक प्रॉपर्टी कन्सलट्ंटचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, कमी मागणी तथा रोख रकमेच्या कमतरतेचा आधीपासून सामना करत असलेल्या भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रावर कोविड-१९ मुळे प्रतिकूल परिणाम पाहायला मिळू शकतो. 

आम्ही कोरोना विषाणूपासून पूर्णपणे मुक्त, उत्तर कोरियाचा दावा

प्रॉपर्टी तज्ज्ञांच्या मते, पुढील सहा महिन्यात संपूर्णपणे मजूर परतताच बांधकाम व्यावसायिकांना भांडवल जमा करण्याची समस्या भेडसावेल. त्यामुळे अशावेळी त्यांच्याकडून उशीरही होऊ शकतो. एकूण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्षाचा वेळ लागू शकतो. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांकडून सरकारला आणखी सवलतींची मागणी वाढत आहे.

क्वारंटाइनमध्येही लोक ऐकायला तयार नाहीत, हॉस्पिटलमध्ये नमाज पठण

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:flats will be cheap in 7 big cities Delhi NCR Mumbai Metropolitan Region Kolkata Chennai Bengaluru Pune and Hyderabadsales sell fall by 35 percent