पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PF वरील व्याजदर कमी करण्याची अर्थ मंत्रालयाची मागणी

प्रातिनिधिक छायाचित्र

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदर कमी करण्याची मागणी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केली आहे. पीएफवर सध्या ८.६५ टक्के इतके व्याज मिळते. जर व्याजदर कमी झाले, तर त्याचा फटका देशातील ८ कोटी नोकरदारांना बसणार आहे. अनेक नोकरदार भविष्यातील ठेव म्हणून पीएफकडे बघतात. व्याजदर कमी झाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानच होणार आहे.

गेल्या आर्थिक वर्षात पीएफवरील व्याजदर ८.६५ टक्के इतके निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी अर्थ मंत्रालयानेही या व्याजदराला मंजुरी दिली होती. त्या आधीच्या आर्थिक वर्षात म्हणजे २०१७-१८ मध्ये पीएफवर ८.५५ टक्के इतके व्याज देण्यात आले होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडे पीएफच्या माध्यमातून जमा होणारा निधी चांगले मानांकन असलेल्या कॉर्पोरेट बॉण्ड्स आणि सरकारशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील शेअरमध्ये गुंतवला जात असतो. 

... या शहरातील इमारत बांधकामांवर ५ वर्षे बंदी येण्याची शक्यता

सध्या ग्राहकांना बचत खात्यावर ४ ते ६ टक्के व्याजदर मिळते. अशा स्थितीत जर पीएफवरील व्याज कमी केले नाही, तर त्याचा परिणाम बँकांतील ठेवींवर होऊ शकतो. दरम्यान, या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी नकार दिला.