ओला आणि उबेर प्रवाशी वाहतूक कंपन्यांमुळे वाहन उद्योग क्षेत्राला फटका बसला आहे, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या २० वर्षांतील सर्वात मोठी मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी चेन्नईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Finance Minister Nirmala Sitharaman: Automobile industry is now affected by BS6 and the mindsets of millennial, who now prefer to have Ola or Uber rather than committing to buying an automobile pic.twitter.com/6KEecyopH3
— ANI (@ANI) September 10, 2019
वाहन उद्योग क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात झालेल्या घसरणीबद्दल निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशातील वाहन उद्योगावर बीएस-६ बरोबरच ओला-उबर कंपन्यांच्या वाहनांचा वाढत्या वापराचा परिणाम झाला आहे. नवी वाहने खरेदी करण्यापेक्षा लोक ओला-उबरच्या वाहनाचा वापर करण्यावर भर देत आहेत. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने इंधनासाठी भारत स्टेज ६ (बीएस ६) मानके १ एप्रिल २०२० पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा देखील वाहन खरेदीवर परिणाम झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
धन्यवाद! मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावर सीतारामन यांची प्रतिक्रिया
मागील आठवड्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उद्योग क्षेत्रासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलत असल्याचे स्पष्ट केले होते. पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहनांवर सरकार कोणतीही बंदी घालणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या क्षेत्रातील उद्योगांना दिलासा दिला होता.