पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महागाई आटोक्यात, औद्योगिक उत्पादनातही वाढीचे संकेत - निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन

देशातील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार करीत असलेल्या विविध उपाययोजनांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. देशातील महागाई आटोक्यात आली असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, औद्योगिक उत्पादनातही वाढ होत असल्याचे स्पष्ट संकेत आकडेवारीवरून मिळत आहेत. 

वाहन आणि बांधकाम उद्योग या क्षेत्रांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चिंतेचे वातावरण आहे. वाहन उद्योगातील आकडे नकारात्मक दिशेने जाऊ लागले आहेत. अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून अर्थव्यवस्थेला नवी उभारी देण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जावेत, यावर विचार सुरू आहे. या संदर्भातील विविध उपाययोजनांची माहिती निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दिली.

महत्त्वाचे मुद्दे
येत्या १९ सप्टेंबरला निर्मला सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना भेटणार

निर्यातीसाठी अर्थपुरवठा करणाऱ्या बँकांना मोठ्या रकमेचे विमा संरक्षण देणार. यामुळे सरकारला १७०० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे.

देशात चार महानगरांमध्ये मेगा शॉपिंग फेस्टिव्हल भरविले जाणार. यामुळे लोकांना आणि व्यापाऱ्यांना नेटवर्किंग करण्यास मदत होईल.ॉ

कर विवरणपत्रात छोट्या करदात्यांकडून काही किरकोळ चुका झाल्या असतील, तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही.

कर विवरणपत्राच्या आढाव्यातील मानवी हस्तक्षेप पूर्णपणे बंद करणार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Finance Minister Nirmala Sitharaman says Inflation is under control and there is a clear sign of revival of industrial production