पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येस बँकेच्या पुनर्बांधणी आराखड्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

येस बँक

बुडीत कर्ज आणि व्यवहारातील अनियमिततेमुळे येस बँकेवर गेल्या आठवड्यात निर्बंध घालण्यात आले होते. येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या बँकेच्या खातेदारांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.या संदर्भात शासकीय आदेश जारी झाल्यानंतर तीन दिवसांत येस बँकेवरील निर्बंध मागे घेतले जातील, अशी माहिती  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन  यांनी दिली. त्याचप्रमाणे येस बँकेच्या पुनरूज्जीवनासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून मंजूर आराखड्यानुसार स्टेट बँक त्या बँकेचे ४९ टक्के भागभांडवल संपादित करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.  

IPLची सुरुवात १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली, बीसीसीआयचा निर्णय

नव्या आराखड्यानुसार एसबीआयला पुढील तीन वर्षांत हे भागभांडवल २६ टक्क्यांखाली आणता येणार नाही. तर इतर  गुंतवणूकदारांना भागभांडवल ३ वर्षांसाठी ७५  टक्क्यांखाली आणता येणार नाही, अशीही माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली. रिझव्‍‌र्ह बँकेने येस बँकेच्या पुनर्बांधणीच्या आराखडा तयार केला होता. येस बँकेला तारण्यासाठी ६२०० कोटींहून अधिकचा निधी आवश्यक आहे. आगामी तीन वर्षांसाठी या बँकेतील गुंतवणुकीसाठी १०,००० कोटी रुपयांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे प्रत्येकी १० रुपयांप्रमाणे १०० कोटी समभाग हे आयसीआयसी बँकही घेणार आहे. स्टेट बँक, आयसीआयसी बँकबरोबरच एचडीएफसी समूह आणि कोटक महिंद्र प्राइम यांरख्या बँकाही  पुनर्बांधणीच्या आराखड्याप्रमाणे येस बँकेत गुंतवणूक करणार असल्याची शक्यता आहे. 

... या देशातील एअर इंडियाची विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत रद्द

गुंतवणूकीबरोबरच येस बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने टाकलेले निर्बंध योजना जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांनी शिथिल होण्याचीही शक्यता  आहे. तसेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या नव्या पुनर्बांधणी आराखड्यानुसार येस बँकेच्या नव्या संचालक मंडळावर स्टेट बँकचे दोन संचालक असतील आणि येत्या सात दिवसात ते पदाभार स्वीकारतील अशीही माहिती सितारमण  यांनी दिली

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Finance Minister Nirmala Sitharaman on Yes Bank reconstruction The moratorium will be lifted within 3 days of notifying the scheme