पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिटकाॅइनप्रमाणे क्रिप्टो करन्सी आणण्याच्या तयारीत फेसबुक

सोशल मीडिया कंपनी फेसबुक क्रिप्टोकरन्सीआधारित प्रणाली आणण्याची योजना तयार करत आहे. (AFP)

सोशल मीडिया कंपनी फेसबुक क्रिप्टोकरन्सीआधारित प्रणाली आणण्याची योजना तयार करत असल्याचे वृत्त आहे. कंपनीचे जगभरात कोट्यवधी युजर आहेत, त्यांच्यासाठी हे चलन उपयोगी पडेल, असे फेसबुकला वाटते. अमेरिकीतील वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. 

फेसबुकची चांदी; नफ्यात दणदणीत वाढ, पण...

यात बिटकॉइनप्रमाणेच डिजिटल कॉइनचा उपयोग होईल. मात्र, हा वेगळा असेल. याचे मूल्य स्थिर ठेवणे फेसबुकचा मुख्य उद्देश असेल. 

फेसबुक नेटवर्कला सादर करण्यासाठी वित्त सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या आणि ऑनलाइन मर्चंटची नियुक्ती करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. सध्या आभासी चलन प्रौद्योगिकीसाठी विविध उपायांचा शोध घेत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. 

F8 : यापुढे तुमच्या फोन आणि डेस्कटॉपवर असं दिसेल फेसबुक

दरम्यान, अमेरिकेतील आर्थिक वर्षानुसार पहिल्या तिमाहीतील नफ्याचे सर्व अंदाज फेसबुकने तोडले असून, चमकदार कामगिरी करीत नफ्यामध्ये वाढ केली आहे. पण त्याचवेळी फेसबुक वापरणाऱ्या ग्राहकांच्या माहितीची सुरक्षितता आणि अमेरिकेतील सरकारकडे सुरू असलेले दावे निकाली काढण्यासाठी करावी लागणारी आर्थिक तडजोड यासाठी कंपनीने तीन अब्ज डॉलरचा निधी राखून ठेवला आहे. कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी फेसबुकच्या शेअर्संना जोरदार प्रतिसाद दिला. फेसबुकच्या शेअरच्या भावात बुधवारी १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.