पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जिओमध्ये फेसबूकची ५.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक, ...हे आहे कारण

फेसबुक

फेसबूककडून बुधवारी एक मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

CM ठाकरेंनी पुणे-मुंबईमधील लॉकडाऊनची शिथिलता केली रद्द

फेसबूककडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिओ लिमिटेडमध्ये ५.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करीत असल्याची घोषणा आम्ही आज करतो आहोत. जिओ ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची कंपनी आहे. या गुंतवणुकीनंतर फेसबूक ही या कंपनीतील सर्वात मोठी गुंतवणूक करणारी एक लहान गुंतवणूकदार झाली आहे. 

'मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याचा केंद्रानं विचार करावा'

फेसबूकच्या गुंतवणुकीमुळे रिलायन्स जिओचे ९.९९ टक्के समभाग पूर्णपणे त्या कंपनीकडे जाणार आहेत, असे रिलायन्सकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. रिलायन्स जिओचे देशात सध्या ३८.८ कोटी वापरकर्ते आहेत.