पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक!, नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत फेसबुक, गुगलची घसरण

प्रातिनिधिक छायाचित्र

अमेरिकेत नोकरी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फेसबुक, गुगल, अल्फाबेट या तिन्ही कंपन्यांनी आपले या क्षेत्रातील सर्वोच्च स्थान गमावले आहे. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कंपनी असलेल्या पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीमध्ये आता या तिन्हीपैकी एकाही कंपनीचा समावेश नाही. या तिन्ही कंपन्यासाठी हे निश्चितपणे धक्कादायक आहे. ग्लासडोअरकडून दरवर्षी अशा स्वरुपाची यादी प्रसिद्ध केली जाते.

संसदेच्या मान्यतेनंतर आता नागरिकत्व विधेयकापुढे हे आव्हान

ग्लासडोअरने यंदा प्रसिद्ध केलेल्या नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत प्रथम क्रमांक हबस्पॉटने मिळवला आहे. ही सुद्धा एक सॉफ्टवेअर कंपनी असून क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. अन्य सॉफ्टवेअर कंपनी डॉक्युसाईनने यादीमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. अल्टिमेट सॉफ्टवेअर ही कंपनी यादीत आठव्या स्थानावर आहे.

गेल्या दहा वर्षांत तीन वेळा नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण असा किताब मिळवणारी फेसबुक कंपनी यंदा यादीमध्ये २३ व्या स्थानावर आहे. यादीमध्ये पहिल्यांदाच फेसबुक २३ व्या स्थानावर गेली आहे. २०११ पासून पहिल्यांदाच ही स्थिती ओढावली आहे. 

गुगल गेल्या आठ वर्षांपासून यादीमध्ये पहिल्या दहा कंपन्यांमध्ये आहे. २०१५ मध्ये तर गुगल यादीत सर्वोत्कृष्ट कंपनी ठरली होती. पण यावेळी गुगल यादीमध्ये ११ व्या स्थानावर गेली आहे. 

GDP घटण्याची चिंता नाही, प्रणव मुखर्जींचे महत्त्वपूर्ण विधान

यादीमध्ये ऍपल यावेळी ८४ व्या स्थानावर जाऊन पोहोचली आहे. ऍपल आतापर्यंत कायम पहिल्या २५ कंपन्यांमध्ये स्थान मिळवित होती. दुसरीकडे ऍमेझॉन कंपनी सलग १२ व्या वर्षी या यादीत स्थानच मिळवू शकलेली नाही. या कंपनीमध्ये अंतर्गत वातावरण सकारात्मक नसल्याचे अहवालात म्हटले आहे.