पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॉग्निझंटमधून लवकरच १३००० कर्मचाऱ्यांची कपात

कॉग्निझंट कंपनी

कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्यूशन कॉर्प या कंपनीने आपल्या व्यवसायातील काही भाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुमारे ६००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे. कॉग्निझंट ही भारतातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. फेसबुकसाठीही ही कंपनी काम करते. त्यामध्ये सोशल मीडियावरील मजकुराची छाननी करणे आणि आक्षेपार्ह मजकूर शोधून काढण्याचे काम कॉग्निझंटकडे आहे. यासोबत आपल्या इतर विभागातही मनुष्यबळ कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे आणखी ७००० जणांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एकूण १३००० कर्मचाऱ्यांना पुढील काळात नोकऱ्यांना मुकावे लागणार आहे.

शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

मजकुराची छाननी व्यवसायातून अशंतः मागे फिरण्याच्या कंपनीच्या निर्णयाचा आर्थिक आघाडीवरही कंपनीला फटका बसणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रिज म्हणाले, मजकुराची छाननी हा दूरगामी दृष्टीने कंपनीच्या कामाचा मुख्य भाग नाही. त्यामुळे कंपनीने त्यावर फार लक्ष न देण्याचे निश्चित केले आहे.

फेसबुक व्हिडिओवरील मजकुर आणि त्यातील भाषा याची छाननी करण्यासाठी कॉग्निझंटकडून हैदराबादमध्ये ५०० जणांची टीम काम करते आहे, असे रॉयटर्सने मे महिन्यामध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले होते. 'द व्हर्ज'नेही कॉग्निझंटमध्ये मजकुराच्या संदर्भात काम करीत असलेले काही कर्मचारी लवकरच अडचणीत सापडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

कॉग्निझंटच्या प्रवक्त्याने या संदर्भात सांगितले की, कंपनीच्या नव्या धोरणानुसार हे बदल करण्यात येत आहेत. त्याचबरोबर मजकुराची छाननी या स्वरुपाच्या कामातून पूर्णपणे बाहेर न पडण्याचे कंपनीने ठरविले आहे. फक्त या स्वरुपाचे काम काही प्रमाणात येत्या काळात कमी केले जाणार आहे.

IND vs BAN : दिल्लीतील सामन्यावर गांगुलींकडूनही मोहोर!

दरम्यान, फेसबुकच्या स्केल्ड ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष अरूण चंद्रा म्हणाले, कॉग्निझंटकडून हे काम कमी केले जात असताना आम्ही त्यांच्यासोबत काम करू जेणेकरून त्याचा फेसबुकच्या कार्यपद्धतीवर परिणाम होणार आहे. फेसबुक आठ देशांमध्ये एकूण आठ खासगी कंपन्यांसोबत मजकुराची छाननी या क्षेत्रात काम करीत असल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.