पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या प्रकोपामुळे पॅरासिटमॉलसह अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी

प्रतिकात्मक छायाचित्र

कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे पॅरासिटमोलसह काही औषधांवर आणि औषधी तत्वांच्या निर्यातीला केंद्र सरकारने प्रतिबंधित श्रेणीत ठेवले आहे. याबाबतची अधिसूचनाही सरकारने जारी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चीनमधील कोरोना विषाणूचा परिणाम भारत आणि चीनमधील व्यापारावर होऊ लागला आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांवरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. चीनमधून कच्चा माल न मिळाल्याने औषधांसह प्लास्टिक उत्पादने, मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे महाग झाली आहेत. त्याचबरोबर चीनला होणारी निर्यात घटल्यामुळे जिरे, कापसासारख्या उत्पादनांचे दर पडले आहेत. जाणून घ्या कोरोना विषाणूचा परिणाम कोणकोणत्या वस्तूंवर पडत आहे.

कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे समोर आला नवा धोका

पॅरासिटमॉल महाग

औषधांशी निगडीत बहुतांश रसायने चीनमधून येतात. सध्या हा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. ताप आणि डोकेदुखीवेळी वापर होणाऱ्या पॅरासिटमॉलसमवेत अनेक जेनेरिक औषधांच्या किंमती २० ते ४५ टक्क्यांनी वाढले आहेत. 

पक्षापेक्षा राष्ट्रहित मोठे - नरेंद्र मोदी

नेब्युलायजर, सर्जिकल उपकरणे महाग

गोरखपूर येथील ठोक औषध बाजार असलेल्या भालोटिया येथे गेल्या दोन आठवड्यांपासून मास्कचा तुटवडा भासत आहे. एन-९५ मास्कचा संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये तुटवडा भासत आहे. अंगदुखी, ताप आणि अँटिबायोटिक औषधांचे दर ३० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. सर्जिकल उपकरणांचे दर वाढले आहेत. ५०० मिलीवाले सॅनिटायजर २३० रुपयांवरुन ३५० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. बीपी मशीन ९५९ ते ११०० रुपये आणि नेब्युलाजरची किंमत १०८० ते १२०८ रुपये झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना झटका, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली