पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तक शिवेंदर आणि मालविंदर सिंग यांना अटक

शिवेंदर आणि मालविंदर सिंग

रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिवेंदर मोहन सिंग त्यांचा मोठा भाऊ मालविंदर मोहन सिंग यांच्यासह अन्य तिघांना आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केली. शिवेंदर सिंग हे फोर्टिसचेही माजी प्रवर्तक आहेत. सर्वांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मला जे योग्य वाटलं तेच मी केलं: राजनाथ सिंह

रेलिगेअर फिन्वेस्टला २३९० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यामध्ये शिवेंदर सिंग, त्यांचा मोठा भाऊ यांचाच हात असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अटक केलेल्या अन्य आरोपींमध्ये कवी अरोरा, सुनील गोदवानी आणि अनिल सक्सेना यांचा समावेश आहे. या सर्वांना गुरुवारी दिवसा अटक करण्यात आली तर मालविंदर सिंग यांना दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री अटक केली.

'अयोध्येतील जागा मुस्लिमांनी राम मंदिरासाठी देऊन टाकावी'

रेलिगेअर फिन्वेस्टकडून या सर्व आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. या सर्व आरोपींना शुक्रवारी दिल्लीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या सर्व आरोपींनी मिळून रेलिगेअरच्या माध्यमातून कोणतीही आर्थिक पत नसलेल्या कंपन्यांना आणि लोकांना कर्जवाटप केले. एकूण २३९७ कोटी रुपयांची कर्जे देण्यात आली. ज्यामुळे कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागला.