पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EPFO ने बदलले PF काढण्याचे नियम

ईपीएफओ

पीएफ सभासदांना पेन्शन किंवा अडव्हान्स घ्यायचे असेल तर ऑफलाइन क्लेम फॉर्म जमा करण्याची यंत्रणा आता बंद करण्यात आली आहे. ईपीएफओकडून क्लेम फॉर्म ऑनलाइनच स्वीकारला जाईल. ऑनलाइन क्लेम फॉर्ममध्ये ओटीपी अनिवार्य करण्यात आला आहे. यासाठी ईपीएफओने सर्व सभासदांना ओटीपी आला नाही तर पुन्हा क्लेम फॉर्म भरण्याचा सल्ला दिला आहे. 

शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी पेन्शन योजना, महिना ३००० मिळणार

ईपीएफओ आपली यंत्रणी अपग्रेड करत आहे. पीएफ सदस्यांच्या खात्यातील दुरुस्ती, आधार कार्ड आणि मोबाइल लिंक आदी कामे ऑनलाइन केली जाऊ शकतात. ज्या सदस्यांचे यूएएन क्रमांक एक्टिव्हेट आहेत, ते हे काम करु शकतात. जे सदस्य लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यांना आता फॉर्म डी ऑनलाइनच भरावा लागणार असल्याचे ईपीएफओने स्पष्ट केले आहे.

ईपीएफओचे क्षेत्रीय आयुक्त (मुख्यालय) रंगनाथ यांनीही सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पत्रक दिले आहे. त्यांनी पीएफ अंशधारकांना स्पष्ट केले आहे की, मुलांचे उच्च शिक्षण, मुला-मुलींचे लग्न, आजारपण आणि घर बांधण्यासाठी अडव्हान्स घ्यायचे असेल क्लेम फॉर्म ऑनलाइन भरावा लागणार आहे. पीएफ ट्रान्सफरसाठीही ऑनलाइन फॉर्म भरावा लागणार आहे. 

मोदींनी शेतकरी अन् व्यापाऱ्यांना दिलेला शब्द पाळला

त्याचबरोबर अंशधारक आणि पेन्शनर आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे नाव, आधार आणि छायाचित्रही ऑनलाइन आपल्या पीएफ खात्यात नोंदवू शकतील. त्यांना ईपीएफओच्या वेबसाइटमध्ये जाऊन यूएएनच्या माध्यमातून आपल्या खात्यात जावे लागेल. पेन्शनर आपल्या यूएएनने हयातीच्या प्रमाणपत्राच्या सत्यापनासाठी ई-साइनही लोड करु शकतील. कोणत्याही सदस्याला आता क्षेत्रीय कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही.