पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ईएमआयमधील सूट सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याची गरज'

स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार

कोरोना विषाणूमुळे आरबीआयने बँकांना ग्राहकांच्या ईएमआयला तीन महिन्यांची सूट देण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक बँकांनी त्याची अंमलबजावणीही केली आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी ही तीन महिन्यांची सूट सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. कोरोना विषाणूचा सामना करण्यात बँकाकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाची भूमिका महत्त्वाची असू शकते, असेही त्यांनी म्हटले. त्याचबरोबर कॉर्पोरेट कर्जावर बँकांना गॅरंटी देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. 

... या कामांना लॉकडाऊनमधून वगळले, सरकारच्या सूचना जारी

कोरोना विषाणूमुळे केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे आरबीआयने सर्व भारतीय बँका आणि भारतीय आर्थिक संस्थांना १ मार्च २०२० ते ३१ मे २०२० दरम्यानचे ईएमआय ३ महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यास सांगितले. ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी आरबीआयने बँकांना सूचना केली होती. त्यानंतर सरकारी बँकांसह खासगी बँकांनीही ग्राहकांना याचा फायदा दिला. 

देशात यंदा सरासरी इतकाच पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना हप्ते फेडण्यास समस्या उद्भवू शकते. रजनीश कुमार पुढे म्हणाले की, सर्वांत आधी एकत्रित स्तरावर अर्थव्यवस्थेस सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर वाहतूक, हॉटेल, रेस्तराँ आणि इतर सेक्टर्सला एक-एक करुन मदत करण्याची गरज आहे. 

'कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट, बेरोजगारीचं प्रमाण वाढणार'

लॉकडाऊनमुळे बहुतांश कंपन्या संकटातून जात आहेत. त्यांच्याकडे रोख रकमेचा अभाव दिसत आहे. त्यामुळे भविष्यात कॉर्पोरेट कर्जाची मागणी वाढू शकते. सरकारकडून कर्जासाठी गॅरंटी मिळाल्यानंतर बँकांना कर्ज देण्यास सोपे जाईल, असेही त्यांनी म्हटले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:EMI exemption needs to be extended for six months says sbi chairman rajnish kumar on the ground of coronavirus