पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमुळे हफ्ता चुकला तरी CIBIL वर परिणाम होणार नाही

लॉकडाऊन आणि कोरोना विषाणूचे संक्रमण यामुळे जर तुम्ही तुमचा कोणत्याही कर्जाचा हफ्ता पुढील तीन महिने द

लॉकडाऊन आणि कोरोना विषाणूचे संक्रमण यामुळे जर तुम्ही तुमचा कोणत्याही कर्जाचा हफ्ता पुढील तीन महिने देऊ शकले नाही, तर त्याचा कोणताही परिणाम तुमच्या सिबिल रेकॉर्डवर होणार नाही. सिबिल रेकॉर्ड बघूनच कोणतीही बँक किंवा वित्तसंस्था ग्राहकाला कर्ज द्यायचे की नाही याचा निर्णय घेत असते. रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारावर सिबिलने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे देशात लागू होणार आणीबाणी? लष्कराने सांगितले सत्य

कर्जाशी संबंधित सर्व माहिती जमविणाऱ्या ट्रान्सयुनियन सिबिलकडून सोमवारी महत्त्वाची माहिती देण्यात आली. लॉकडाऊननंतर रिझर्व्ह बँकेने कोणत्या सूचना केल्या आहेत. त्या सर्वांचा अभ्यास केला जात असल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.

जगात दीड लाख कोरोनाग्रस्त रुग्ण बरे,८० % जणांना रुग्णालयाची नाही गरज

ट्रान्सयुनियन सिबिलने म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना ग्राहकांचे हफ्ते तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर आम्ही सर्व बँकांनी कोणाकोणाला कर्ज दिले, त्याची माहिती गोळा करीत आहोत. ही माहिती जमविल्यावर आम्ही कोणत्याही ग्राहकाचा जर हफ्ता पुढील तीन महिन्यांत चुकला तर त्याच्या सिबिल रेकॉर्डवर कोणताही परिणाम न होण्यासाठी व्यवस्थेमध्ये आवश्यक बदल करीत आहोत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:emi bounce cibil score missing home personal other loans due date installment payment failure will not impact