पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुमच्या PF खात्यामध्ये व्याज जमा झाले? घरबसल्या असा पाहा बॅलन्स

तुम्ही ऑनलाईन देखील आपल्या खात्यासंदर्भातील माहिती तपासून पाहू शकता.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) कडून ६ कोटीपेक्षा अधिक भविष्य निर्वाह निधीच्या खातेदारांच्या खात्यात व्याज जमा केले आहे. अनेक खात्यांमध्ये २०१८-१९ च्या वर्षासाठी ८.६५ टक्के दराने व्याज जमा झाले आहे. तर २०१७-१८ साठी ८.५५ टक्के दराने व्याज जमा झाले आहे. तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील जमा रक्कम ही एसएमएस किंवा ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता.

बॅलन्स तपासण्याची प्रक्रिया 
१. जर तुमचा यूएएन नंबर ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असेल तर  7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG (अखेरची तीन अक्षरे भाषेसंदर्भात आहेत. ) असा मेसेज पाठवा. तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून खात्यासंदर्भात माहिती मिळेल. 

२. जर तुम्हाला हिंदी भाषेत माहिती हवी असेल तर EPFOHO UAN HIN असा मेसेज पाठवा. ही माहिती तुम्हाला इंग्रजी, मराठी, हिंदी, पंजाबी, कन्नड, तेलगू, तमिल, मल्याळम आणि बंगाली भाषेमध्ये मिळू शकते. एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळवण्यासाठी तुमचा यूएएन, बँक खाते, पॅन (PAN) आणि आधार (AADHAR) लिंक असणे आवश्यक आहेय  

३ ईपीएफओच्या वेबसाइटवर तुम्ही पासबुकच्या माध्यमातून तुम्ही खात्याबाबतची संपूर्ण माहिती मिळवू शकता.  पासबुक पाहण्यासाठी यूएएन क्रमांक असणे आवश्यक आहे.  

४. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन  11-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन देखील तुम्ही माहिती मिळवू शकता. मिस्ड कॉलनंतर तुम्हाला ईपीएफओकडून तुमच्या खात्यासंदर्भातील माहिती मिळेल. यासाठी देखील यूएएन, पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे.