पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PMC बॅंकेच्या तपासात EDची एंट्री, मुंबईत सहा ठिकाणी छापे

पीएमसी बँक

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील गैरव्यवहारांप्रकरणी शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून, सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबई आणि परिसरात शुक्रवारी सकाळी हे छापे टाकण्यात आले. 

महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधींचा मोठा प्लॅन

आतापर्यंत या गैरव्यवहारांचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात होता. पण आता सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून छापे टाकल्यामुळे तपासाला आणखी गती येणार आहे. बॅंकेतील गैरव्यवहारांप्रकरणी राकेशकुमार वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग यांना आधीच अटक करण्यात आली आहे.

हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा या बँकेतील गैरव्यवहारात काय संबंध आहे. याचाही तपास सक्तवसुली संचालनालयाकडून करण्यात येणार आहे. वाधवान पिता-पुत्र हे याच कंपनीचे प्रवर्तक आहेत. पीएमसी बँकेकडून वितरित करण्यात आलेल्या एकूण कर्जापैकी ७३ टक्के कर्ज हे एकट्या हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. बँकेकडून वितरित करण्यात आलेले एकूण ४३५५ कोटी रुपयांचे कर्ज सध्या संशयाच्या फेऱ्याखाली आहे. त्यापैकी २१४६ कोटी रुपयांचे कर्ज हे वाधवान यांनाच देण्यात आले आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार ३१ ऑगस्ट २०१९ रोजी राकेशकुमार वाधवान यांच्या खात्यामध्ये २००९ कोटी रुपयांची शिल्लक होती.

डीलीट केलेल्या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजचा आता मागमूसही राहणार नाही

पीएमसी बँकेच्या व्यवहारांवर काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत. बँकेला कर्ज वितरित करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. त्याचबरोबर बँकेतून पैसे काढण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सध्या महिन्याल केवळ २५ हजार रुपयेच काढण्याचे बंधन ठेवीदारांवर घालण्यात आले आहेत.