पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ईडीकडून येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्या वरळी निवासस्थानी छापेमारी

 येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी)  येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल या निवास्थानी शुक्रवारी रात्री उशीराने छापेमारी केली. बँकेतील पैशाच्या अफरातफरीच्या (मनी लाँडरिंग) च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येस बँकेकडून घरांसाठी कर्ज वितरणातील अग्रणी बिगर बँकिंग संस्था 'दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल)'ला दिलेल्या कर्जासंदर्भात राणा यांची चौकशी करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात : PM मोदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी येस बँकेच्या प्रकरणावर भाष्य करताना डीएचएफएलचा उल्लेख केला होता. त्यानंतर ईडीकडून राणा यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली आहे. २०१८ पासून येस बँक संकटात सापडली होती. रिझर्व्ह बँकेने कर्जासंबंधीतील त्रूटींच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन प्रमुख राणा कपूर यांना पदावरुन हटवण्यात आले होते.

कोरोना: जवळपास ३० हजार लोक डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली

त्यानंतर रवनीत गिल यांच्या नेतृत्वाखाली बँकेतील कर्जासंबंधीचा घोटाळा समोर आला. २०१९ च्या पहिल्या तिमाहीत बँकेला पहिल्यांदा तोटा सहन करावा लागला होता. 'दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल) संचालक कपिल वधावन यांनी गँगस्टार इक्बाल मिर्चीच्या साथीने पैशाची अफरातफर झाल्याचे ईडीने म्हटले होते.