पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जेट'चे नरेश गोयल आणि पत्नीविरोधात ईडीकडून आणखी एक गुन्हा

नरेश गोयल

बंद पडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला. आर्थिक हेराफेरी रोखणे कायद्यातील (पीएमएलए) तरतुदींनुसार आणि मुंबई पोलिसांकडे दाखल असलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. नरेश गोयल यांची याआधी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्यातील (फेमा) तरतुदींचे उल्लंघन केल्या प्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली होती.

दाभोलकर हत्या : समुद्राच्या तळातून पिस्तूल शोधण्यात सीबीआयला यश

मुंबईस्थित प्रवासी वाहतूक कंपनीची ४६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडविधान संहितेतील विविध कलमांखाली या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य वित्त अधिकारी राजेंद्रन नेरूपाराम्बिल यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

दिल्ली हिंसाचार: ५३१ गुन्हे दाखल तर १६०० जण ताब्यात

१९९४ पासून अकबर ट्रॅव्हल्स जेट एअरवेजसोबत व्यवसाय करीत आहे. पण नरेश गोयल यांनी जेट एअरवेजची आर्थिक परिस्थिती लपवून ठेवली. त्याचवेळी आपल्यावरील आर्थिक ताणाचा अकबर ट्रॅव्हल्सला कोणताही धक्का बसणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या याच आश्वासनाच्या आधारावर अकबर ट्रॅव्हल्सने मॅंचेस्टर-मुंबई विमान प्रवासाची तिकीटे स्वस्तामध्ये प्रवाशांना विकली. पण जानेवारी २०१९ मध्ये जेट एअरवेजची काही विमाने ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यानंतरही जेटकडून अकबर ट्रॅव्हल्सची दिशाभूल करण्यात आली. जेट एअरवेजची आर्थिक स्थिती व्यवस्थित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पण या प्रकरणात अकबर ट्रॅव्हल्स कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.