पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतातील आर्थिक मंदीला जागतिक स्थितीही कारणीभूत, आर्थिक सर्वेक्षण अहवाल

के. सुब्रमण्यन

भारतातील विकास दर चालू आर्थिक वर्षात कमी होण्याला जागतिक परिस्थितीही काही प्रमाणात कारणीभूत असल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल शुक्रवारी संसदेमध्ये सादर करण्यात आला. अहवाल सादर झाल्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यन यांनी अहवालातील निष्कर्षांबद्दल विस्ताराने माहिती दिली.

Coronavirus : काळजी घ्या पण अति करू नका, चीनचे इतर देशांना आवाहन

भारतात विकास दरामध्ये घट झाल्याचे दिसून येते आहे. पण याला काही प्रमाणात जागतिक पातळीवरील परिस्थितीही कारणीभूत आहे. जागतिक पातळीवर २०१९ मध्ये आर्थिक स्थिती फारशी सकारात्मक नव्हती. त्याचा परिणाम काही प्रमाणात भारतीय अर्थव्यवस्थेवरही झाला असल्याचे के सुब्रमण्यन यांनी सांगितले. 

शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यापारासाठी आवश्यक वातावरण निर्मिती, व्यवसायासाठी उपयुक्त धोरणांचा पुरस्कार आणि आर्थिक स्थितीवरील विश्वास वृद्धिंगत करण्याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात आले आहे. सर्वेक्षण अहवालात सकारात्मकपणे समतोल भूमिका मांडण्यात आली आहे. 

राज ठाकरेंचे विद्युत नियामक आयोगाला पत्र; BESTच्या वीज दरवाढीवर आक्षेप

चालू आर्थिक वर्षाच्या अखेरिला एकूण देशांतर्गत उत्पादन दर (जीडीपी) पाच टक्के राहिल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २००८-०९ आर्थिक वर्षानंतर पहिल्यांदाच जीडीपी इतक्या खाली आला आहे.